कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी वेधले सिडकोचे लक्ष
नवी मुंबई : गेली अनेक महिन्यांपासून सानपाडा रेल्वे स्टेशन खालील भूयारी मार्गाची अवस्था व या भूयारी मार्गाच्या रस्त्याची झालेली दुरावस्था व खड्डयामूळे वारंवार होणारे लहान-मोठे अपघात आणि त्यामूळे होणारी वाहतूक कोंडी या विषयी प्रभाग क्र.६५ मधील सेक्टर-३० परिसरातील व सानपाडा वसाहतीतील नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने २८ मे रोजी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सिडकोच्या नवी मुंबई क्षेत्राचे मुख्य अभियंता सुरेश वरखेडकर यांची भेट घेऊन त्यांना या भूयारी मार्गाच्या तात्काळ दुरुस्ती करण्यासंबंधीचे मागणी पत्रक दिले व सिडको भवन येथील सुनिल दराडे (मुख्य अभियंता-विशेष प्रकल्प सिडको) यांच्या समवेत त्यांच्या दालनात पी.डब्लू. बारापात्रे (अधिक्षक अभियंता-प्रकल्प नियोजन व दर्जा) आणि गटकळ (सहा. अधिक्षक अभियंता-प्रकल्प नियोजन व दर्जा)या अभियंता विभागातील अधिकार्यांसह बैठक घेऊन या भूयारी मार्गाचा वापर हा नागरिक मोठ्या प्रमाणात ए.पी.एम.सी. बाजारपेठ, तुर्भे परिसर, सायन-पनवेल महामार्ग, शाळा-महाविद्यालयाकडे जाण्याकरीता करण्यात येत असून हा भूयारी मार्ग जनतेच्या दृश्टीकोनातून दैनंदिन वापरासाठी किती महत्वाचा आहे याबाबतची माहिती दशरथ भगत यांनी अभियंता विभागातील अधिकार्यांना निदर्शनास आणून दिली व या भूयारी मार्गाची अंतर्गत दुरुस्ती ही तातडीने पावसाळया अगोदर करावी व या भूयारी मार्गाला जोडणार्या दोन्ही बाजूकडील ऍप्रोच रोडचे डांबरीकरण करण्याचे मागणी केली, तसे आदेष सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्यांकरवी तत्काळ संबंधीत अभियंता विभागाला आदेष देण्यात आले असून सदरच्या भूयारी मार्गाचे काम लवकरच केले जाणार असून त्यामूळे सानपाडा परिसरातील होणारी वाहतूक कोंडी लवकरच दूर होऊन सानपाडा वसाहत व सेक्टर-३० परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल.