नवी मुंबई : आयुष्यामध्ये समाजकारणात, राजकारणात जनसेवा करताना दिवसाची रात्र केली आहे. खोटी आश्वासने दिली नाही व देणारही नाही. कामे करत गेलो, कामाचे श्रेय घेण्याच्या भानगडीत पडलो नाही. काम झाल्यावर संबंधितांच्या चेहर्यावरील समाधान हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. आयुष्यात कधीही मी कोणाच्याही समाधानाकरता चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी केले.
कोपरखैरणेतील बालाजी निवासस्थानी पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर आल्यावर त्वरीत आ. संदीप नाईकांच्या दैनंदिन कामकाजाला प्रारंभ होतो. ऐरोली मतदारसंघातलेच नाही तर बेलापुर, ठाणे, पनवेल येथील रहीवाशीदेखील आपली कामे घेवून आमदार संदीप नाईकांच्या भेटीसाठी आलेले बुधवारी (दि.3 जुन) पहावयास मिळाले. कोणी अॅडमिशनसाठी तर कोणी नोकरीसाठी तर कोणी महापालिकेच्या कामानिमित्त आमदार संदीप नाईकांच्या भेटीकरता आले होते.
रोजगाराकरता आलेल्या युवक-युवतींकरता नवी मुंबईचे ओबामा आमदार संदीप नाईक स्वत: त्या कंपन्यातील व्यवस्थापकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत होते. अॅडमिशनसाठ आलेल्यांची कामे करताना संबंधितांच्या शाळा-महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आ. संदीप नाईक भ्रमणध्वनीवरून अॅडमिशनकरता विनंती करत होेते. कामांचे त्वरीत निदान होत असल्याने व नवी मुंबईतील अन्य राजकारण्यांप्रमाणे आश्वासनांवर बोळवण होत नसल्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर पहावयास मिळत होते.
अचानक भेटीसाठी आलेल्या आंगतुकांने आपण त्यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत रस्ता रूंदीकरणामुळे आपले व्यक्तिगत नुकसान होत असल्याचे सांगत आमदारांना रस्ता रूंदीकरण थांबविण्याकरता महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याचे सुतोवाच केले. असंख्य लोकांची विनम्रपणे कामे करणार्या आमदार संदीप नाईक हे ऐकताच संतप्त झाले. त्यांनी यावेळी रस्ता रूदींकरण हे विकासाकरता आवश्यक आहे. वाहतुककोंडीची समस्या त्या ठिकाणी होत असल्याने रस्ता रूदींकरण होत आहे. तुम्ही माझे कार्यकर्ते आहात तर तुमचे होणारे नुकसान मी माझ्या खिशातून भरून देतो. पण माझ्या कार्यकर्त्याच्या समाधानाकरता रस्ता रूदींकरणाला मी अडथळा आणणार नाही. लोकोपयोगी कामे होणे गरजेचे आहे. मी उभ्या आयुष्यात लोकोपयोगी कामाला प्राधान्य दिले आहे. चुकीची कामे कधी केली नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना, समर्थकांनाही मी करून देत नाही. त्यामुळे माझ्याकडून यापुढे अशी अपेक्षा बाळगू नका असे स्पष्टपणे खडसावत आमदार संदीप नाईकांनी सर्व उपस्थितांसमोर संबंधित कार्यकर्त्याची कानउघडणी केली.