९ जूनच्या मोर्च्यात मनसे कार्यकर्ते सहभागी होणार- गजानन काळे
नवी मुंबई : गरजेपोटी बांधलेल्या घरांवरील कारवाई थांबविण्याचा निर्धार सर्व स्तरावरून होत आहे. ९ जून रोजी सकाळी १०:०० वाजता सिडको भवनावर भव्य मोर्चा आयोजित केला असून यामध्ये नवी मुंबई मनसेसुद्धा आपल्या आपल्या शेकडो कार्यकर्त्यासमवेत प्रकल्पग्रस्तांचा पाठीशी उभा राहणार आहे.
नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले कि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सिडको सातत्याने दुर्लक्ष करण्यात अव्वल राहिली आहे. ज्या प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनीवर हे शहर उभे राहिले त्यांच्यावर अन्याय करणे सिडकोला शोभत नाही. आमच्या पक्षातसुद्धा कित्येक प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते आहेत त्यांच्या समवेत ९ जून ला होणार्या मोर्चात पक्ष पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांना सिडको अभय देताना दिसते. पामबीच मार्गावर सत्तर ते ऐंशीच्याच्या वर टॉवर अनधिकृत रित्या उभे झालेत त्यांनी चटईक्षेत्रात मोठा घोळ केला असून सिडकोला त्यांनी जी नियमाची पायमल्ली केली ते दिसत नसून प्रकल्पग्रस्ताची गरजे पोटी बांधलेली घरे दिसतात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या नर्सरी असून त्यांना अभय मिळाला आहे शहरात कित्येक हॉटेल आणि व्यावसायिक गळ्यानी मर्जीन स्पेस वापरला आहे परंतु ज्यांच्या मुळे हे शहर उभे आहे अश्या प्रकल्पग्रस्तांची घरेच सिडकोला दिसतात का? असा सवाल मनसे करीत आहे. सिडको तसेच एम आई डी सी च्या जागेवर परप्रांतीयांनी अनधिकृत घरे व बांधकाम केले आहे. त्यांच्यावर सिडको कारवाई करताना शंभरदा विचार करते प्रकल्पग्रस्त व सिडको यांच्यात जो करारनामा झाला त्या प्रमाणे प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या वाट्याचे साडे बारा टक्केचा हिस्सा मिळाला नाही कुटुंब वाढले परंतु सिडको याची दखल न घेता केवळ कारवाईचा बडगा पुढे करताना दिसते.
प्रकल्पग्रस्तांच्या या मोर्च्याला मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.