नवी दिल्ली- फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वांत श्रीमंत 100 खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघातील महेंद्रसिंह धोनी याने स्थान पटकावले आहे. शंभर खेळाडूंच्या या यादीत तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत अमेरिकेचा मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर हा पहिल्या स्थानावर आहे.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या तो एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवित आहे. धोनी 23 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी तो 22 व्या स्थानावर होता. धोनीची एकूण संपत्ती 31 मिलियन डॉलर (198 कोटी रुपये) इतकी आहे.
गोल्फपटू टायगर वुड्स, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आहेत. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (13), सेबॅस्टियन व्हेटेल (21), रॅफेल नदाल (22) आणि वॅन रुनी (34) आणि उसेन बोल्ट (73) या प्रमुख खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले आहे.