उरण : मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्यानंतर राज्य सरकारने मॅगीवर घातलेल्या बंदी विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
अन्न व औषधद्रव्य प्रशासन (एफडीए) विभागाने सहा जून रोजी मॅगीवर बंदी घातली आहे. तर अन्न सुरक्षा आणि प्रमाण प्राधिकरण (एफएसएसएआय) विभागानेही पाच जून रोजी दिलेल्या अहवालात मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्याचे म्हटले आहे.
मात्र मॅगीमधील त्रुटी कंपनीने दुर केल्या आहेत. यामुळे एफडीए आणि एफएसएसएआयने घातलेल्या या बंदी विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, हानीकारक असलेल्या मॅगीवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे. तसेच बाजारामधील मॅगी नेल्से कंपनीने स्वत: निर्णय घेत ती बाजारातून परत घेतली आहेत.