मुंबई : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना नातू झाला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मोठी मुलगी अहाना देओल- वोरा हिला मुलगा झाला आहे.
हेमा मालिनेने ही बातमी ट्विटरवरुन जाहिर केली आहे. इशा देओलनेही ही आनंदाची बातमी आपल्या ट्विटरवरुन चाहत्यांना कळवली आहे. अहाना आणि तिचा नवजात मुलगा यांची तब्येत उत्तम असल्याचे तिने म्हटले आहे.
अहानाचे गेल्यावर्षी दोन फेब्रुवारी 2014 रोजी दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरा याच्याशी विवाह झाला. बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आणि प्रमूख व्यावसायिकांच्या उपस्थितीत त्यावेळी मुंबईत धमाकेदार पार्टी झाली होती. आता नविन पाहुण्याच्या स्वागतासाठी अहानाची छोटी बहीण ईशा देओल ही एक जंगी पार्टी आयोजित करणार आहे.