ठाणे : तब्बल चार तासांनंतर कल्याण-कर्जत दरम्यानची लोकलसेवा रुळावर आली आहे. उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान रुळाखाली खड्डा पडल्याने कल्याण-कर्जत मार्ग सकाळी 6.25 वाजल्यापासून ठप्प झाला होता. रेल्वेने युद्धपातळीवर भराव टाकण्याचे काम करून रुळ पूर्ववत केला आहे.
मुसळधार पावसामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांखालची माती वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे सकाळपासून कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होऊन कल्याणपुढच्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. तब्बल चार तास कल्याण-कर्जत मार्गावर एकही लोकल धावू शकली नाही. कर्जत, अंबरनाथ, बदलापूर भागातून मुंबईत कामासाठी येणारे प्रवासी रेल्वे स्थानकांवरच अडकून पडले. आता मात्र रुळ पूर्ववत केल्यानंतर हळूहळू लोकलसेवा रुळावर येऊ लागली आहे.