नवी मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)(ब) अन्वये नामनिर्देशनाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत लक्ष्मण सुतार, सुरज बाळाराम पाटील, घनशाम रतन मढवी, शिवसेनेचे राजेश शिवाजी शिंदे, मनोज गोपिनाथ हळदणकर यांची नेमणूक करण्यात आल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेप्रसंगी जाहीर केले.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 25 (2) आणि (7) सह वाचावयाच्या कलम 31अ (2) अन्वये नामनिर्देशनाव्दारे साबु डॅनिअल, विरेश सिंग, प्रदिप गवस, विसाजी लोके, राजेंद्र आव्हाड, रामचंद्र दळवी यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी जाहीर केले.
नवनिर्वीचित नामनिर्देशित सदस्य व परिवहन सदस्य तसेच महापालिका पदाधिकारी यांचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका दिनेश वाघमारे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.