संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : कोपरखैराणे परिसरातील भाविकांना ज्ञानविकास संस्थेच्या शाळेच्या प्रागंणात रविवार दि. 12 जुलै ते शनिवार दि. 18 जुलै या दरम्यान मथुरानिवासी प.पू इंद्रदेवजी महाराजांच्या प्रवचनाचा लाभ श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून मिळणार आहे.
रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कोपरखैराणेत भव्य शोभायात्रा काढून या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यादरम्यान दररोज सकाळी 6 ते 9 दरम्यान रविवार 12 जुलै रोजी भागवत महात्म्य, सोमवार 13 जुलै रोजी सती दक्ष यज्ञ विध्वंस, मंगळवार 14 जुलै रोजी श्री. नरसिंह अवतार – श्री. दत्तगुरू अवतार, बुधवार 15 जुलै रोजी श्री वामन अवतार व श्री कृष्ण जन्मोत्सव, गुरूवार 16 जुलै रोजी श्रीकृष्ण बाललीला-दहीहंडी व रासलीला, शुक्रवार 17 जुलै रोजी गोवर्धन पुजन, कंस वध, रूक्मिण स्वयंवर, शनिवार 18 जुलै रोजी सुदामा भेट, परिक्षित मोक्ष व भागवत पोथी दर्शन या विषयावर मथुरानिवासी प.पू इंद्रदेवजी महाराज प्रवचन देणार आहेत.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्ताने दररोज सकाळी 8 वाजता श्री लक्ष्मी नारायण यज्ञांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास कोपरखैराणे, घणसोली, ऐरोली, वाशी,तुर्भे, सानपाडा, नेरूळसह नवी मुंबईच्या कानकोपर्यातील सर्वच भाविक मंडळींनी मोठ्या संख्येने भक्तिभावाने सहभागी व्हावे असे आवाहन आई वत्सला प्रतिष्ठानचे आयोजक नामदेव भगत यांनी केले आहे.