संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : बोनकोडे गावामध्ये दोन दिवसीय पावसाळी क्रिकेट स्पर्धेला शनिवारी सकाळी सुरूवात झाली असून ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले.
बोनकोडे गावातील बोनकोडे-कोळीवाडातील एकवीरा मित्र मंडळाच्या वतीने या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबईतील 24 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार संदीप नाईक यांनी केले, त्यावेळी व्यासपिठावर नगरसेवक लिलाधर नाईक, गजानन दळवी, भालचंद्र दळवी, रविकांत नाईक, रोहीदास मेहेर यांच्यासह मोठ्या संख्येने क्रिडापे्रमी उपस्थित होते.
यावेळी केवळ उद्घाटन करण्यावर समाधान न मानता आमदार संदीप नाईकांनी तेथील फलदाजांना बराच वेळ गोलदांजी करत पुन्हा एकवार आपल्या क्रिकेटप्रेमाचे दर्शन घडविले. राजकारणाच्या दगदगीत व्यायामाच्या माध्यमातून आमदार संदीप नाईकांचा फिटनेस आजही कायम असल्याचे स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान क्रिकेटप्रेमींना पहावयास मिळाला.
रविवारी सांयकाळी 6 वाजल्यानंतर आमदार संदीप नाईकांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे.