हरेश साठे
पनवेल : महाकवि कालिदास दिनानिमित्त हौशी कवि-कवयत्रींसाठी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखेच्यावतीने रविवार दिनांक 26 जुलै रोजी रायगड जिल्हा व पनवेल तालुका या दोन गटांमध्ये पनवेल शहरातील कश्यप हॉलमध्ये काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नवकवी, शिघ्रकवी व बुजूर्ग कवी यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावा आणि कवींना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या पनवेल शाखेच्यावतीने काव्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेला दरवर्षी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पनवेल तालुक्यासोबत रायगड जिल्हा गटाची स्पर्धाही यंदापासून सुरू करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभाग घेणार्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार असून दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविणार्या तीन स्पर्धकांस रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा लाभ रायगड जिल्हा व पनवेल तालुक्यातील जास्तीत-जास्त कवींनी घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे. स्पर्धेत सहभाग होण्यासाठी 13 ते 23 जुलैपर्यंत नाव नोंदणी करता येणार असून अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी शामनाथ पुंडे (9821758147), अनिल कोळी (9769409161) किंवा स्मिता गांधी(9029914867) यांच्याशी सपंर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेे आहे.