संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग 83 जुईनगरमध्ये रविवार, दि. 12 जुलै रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. तनुजा श्रीधर मढवी यांच्या पुढाकाराने या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
एप्रिल 2015 मध्ये महापालिकेच्या झालेल्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत विजयी झाल्यापासून जुईनगर परिसरातील प्रभाग 83मध्ये नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी सातत्याने विविध लोकोपयोगी कामाचा धडाका लावला असून जनसंपर्कावरही सातत्याने भर दिला आहे. निवडून आल्यावरही त्यांनी तात्काळ यापूर्वीही प्रभागात स्वच्छता अभियान राबविले होते. स्वच्छता प्रभागाची अन् हकालपट्टी रोगराईची या ब्रीदवाक्याने प्रेरीत होवून नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी प्रभाग स्वच्छतेवर भर दिला आहे.
रहीवाशांनी सहकार्य केल्यास प्रभागाला नवी मुंबईमध्ये स्वच्छ ठेवणे आपले ध्येय असल्याची माहिती नगरसेविका तनुजा मढवी यांनी दिली.