कल्याण भाजपा जिल्ह्याचे मिशन केडीएमसी
गणेश पोखरकर
कल्याण : सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी भाई मोदी यांनी सबका विकास सबका साथ ही दिलेली आर्त हाक सार्थ ठरवण्यासाठी सामान्य जनतेचे काम करा. आज ही आणि उद्या ही मजबूत जनाधार असलेला एकमेव पक्ष भाजपाचं आहे. यामुळे आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेत एक हाती सत्ता आपलीच असेल असा आत्मविश्वास भाजपा पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी शनिवारी कल्याण शहरात व्यक्त केला.
कल्याण जिल्हा भाजपाचे मिशन केडीएमसी अतंर्गत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन शिवाजी चौक येथील गीता हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष खासदार कपील पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, केडीएमसी उपमहापौर राहुल दामले, भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, भाजपा नेते देवानंद भोईर, भाजपा नेते राजेश वानखेडे आणि महिला जिल्हा अध्यक्ष संजीवनी पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेचे लक्ष डोळ्यापुढे ठेऊन अनेक राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करीत आहेत. याच दृष्टीकोनातून आणि पक्ष संघटनात्मक मजबुतीसाठी राबविण्यात येणारे महत्वपूर्ण जनसंपर्क अभियानाच्या मार्गदर्शक सूचना देण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपाच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा नेत्यांनी आपल्या भाषणातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचे महत्वपूर्ण काम केले. यामध्ये भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांनी जनसामान्याची मजबूत नाळ जोडणार्या महाजनसंपर्क अभियानाची सक्षम अंबलबजावणी करा. त्याचप्रमाणे जनसामान्याचा विश्वास संपादन करून त्यांचे प्रश्न सोडवा विजय आपलाच असेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर केंद्र आणि राज्यसरकारचे लोकउपयोगी निर्णय तसेच योजना लोकांपर्यंत पोहचावा अशी महत्वपूर्ण सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. भाजपामध्ये कार्य करणार्यालाच पद दिले जाते, यासाठी येणार्या आगामी निवडणुकीत स्वतःला सिद्ध करीत विजयी निकाल द्या असे महत्वपूर्ण विचार प्रदेश उपाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि खासदार कपील पाटील यांनी व्यक्त केले.
:- विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश –
कल्याण आणि अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. अंबरनाथ नगरपरिषदेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक याकुब सयैद्द मीरा यांच्या नेतृत्वात अंबरनाथ मधील मुसलीम कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्याचप्रमाणे कल्याण शहारतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय देवरे, पंकज वीर सर, दिपक दोरालेकर, डॉ रूप इंदर कौर यांच्यासह 50 कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.