ठाणे :- भाईंदर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाश्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे 48 सी.सी.टीव्ही. कॅमेरे बसविण्यात आले. या सी.सी.टीव्ही. प्रणालीचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भाईंदर स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारामुळे रिक्षा स्टँडच्या परिसरात अधिक सी.सी.टीव्ही. वाढवण्यात यावेत अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली. त्याचबरोबर प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन रात्रीच्या वेळी एफ.ओ.बी. वरील तृतीय पंथीच्या त्रासामुळे तेथील नागरीक त्रस्त झाले होते. तेथील गैरप्रकार हटवून त्या एफ.ओ.बी. वर कायम आपल्या एका सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी असे आदेश देण्यात आले. तसेच प्लॅटफॉर्मवरील उपहारगृहाच्या नियमानुसार रेल्वे प्रशासनाने ठरवून दिलेली व त्या व्यतिरिक्त असणारी वाढीव जागा कमी करण्यात यावी जर या आदेशाचे पालन न केल्यास उपहारगृहाची वाढीव जागा तोडण्यात यावी असे आदेश दिले. भाईंदर रेल्वे स्थानकात मंजूर झालेले 4 सरकते जिने व 2 लिफ्ट व मिरा रोड येथे 1 सरकता जिना या कामास लवकर सुरवात करा आणि ठाणे रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या वातानुकुलीत शौचालयाच्या धर्तीवर मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकात सर्वे करून लवकरात लवकर वातानुकीत शौचालयाची निर्मिती करा अशी मागणी करण्यात आली. मिरा रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 4 शेजारी विना वापर असलेली जागा स्थानकाला जोडण्यात यावी, जेणेकरून स्थानकाची रुंदी वाढेल. तसेच बंद पडलेली व प्रवाशांना अडथळा देणारी महानगरपालिकेची जकात वसुली कॅबिन ही हटवण्यात येऊन मार्ग मोकळा करण्यात यावा.
त्यावेळी रेल्वे प्रबंधक शैलेंद्र कुमार, सिनिअर डीसीएम बेला, डीसीएम अशोक तिवारी, एमआरव्हिसी मुख्य अभियंता, मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख मनोज मयेकर, प्रशांत पालांडे, उपशहरप्रमुख विलास राऊत, नगरसेवक धनेश पाटील, नगरसेविका जयमाला पाटील, शुभांगी कोटियन, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.