संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : जुईनगर प्रभाग क्रं. ८३ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि स्थानिक नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाला रहीवाशांचा उत्स्फूर्त प्र्रतिसाद मिळाला. यावेळी नगरसेविका सौ. तनुजा मढवी स्वत: रॅबिट व डेब्रिज काढण्यात व्यस्त असल्याचे पाहून आपले मतदान वाया गेले नसल्याची व योग्य नगरसेविका आपल्या प्रभागाला मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व परिसरातील गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकार्यांकडून व्यक्त करण्यात येत होती.
सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास या स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. स्वत: नगरसेविका सौ. तनुजा मढवी हाती घमेले व खोरे घेवून रॅबिट व डेब्रिज काढण्यात सहभागी झाल्या. महापालिकेचे कर्मचारी आलेे, पण ते जेमतेम दोन ते तीनच असल्याने नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी तात्काळ सफाईसाठी स्वखर्चाने खासगी कामगार मागावून घेतले.
जुईनगर सेक्टर २३ येथील जुनी व्यायामशाळा व अंगणवाडी येथील डेब्रिज व रॅबिट काढण्यास सुरूवात करून स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला. या अभियानात नगरसेविका सौ. तनुजा मढवी, श्रीधर मढवी, जयेश मढवी, कुणाल मढवी, प्रीतम भोईर, रोहीत मढवी, सुरेश पाटील, रामनाथ ठाकूर, अण्णा पाटील, बबन पाटील, नंदकुमार पाटील, साधना बर्गे यांच्यासह स्थानिक रहीवाशी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
नगरसेविका बनल्यावर सौ. तनुजा मढवी यांनी प्रभागात हे दुसर्यांदा स्वच्छता अभियान आयोजित केले असल्याची माहिती श्रीधर मढवी यांनी दिली. प्रभागातील बकालपणा पूर्णपणे नष्ट होत नाही आणि स्थानिक रहीवाशांना परिसर स्वच्छतेचे महत्व समजत नाही, तोपर्यत सातत्याने अशा प्रकारचे स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी दिली.