ठाणे : गेली नऊ वर्षापुर्वी रेल्वे बॉम्बस्फोटात जखमी झालेले व मृत्यूशी झुंज देणारे पराग सावंत यांच्या पत्नी प्रिती पराग सावंत यांना पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकतील बुकिंग ऑफिसमध्ये नोकरी देण्यात आली होती परंतु या नोकरीसाठी त्यांना भाईंदर येथून अंधेरी स्थानकामध्ये जावे लागत होते. नुकतेच पराग सावंत यांचे निधन झाल्याने मुलीच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्याने एकुलत्या एक मुलीच्या संगोपनासाठी जवळच्या स्थानकावर म्हणजे भाईंदर स्थानकात नोकरी मिळवून देण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी पश्चिम रेल्वे प्रबंधक शैलेंद्र कुमार यांच्याकडे मागणी केली असता त्यावर पश्चिम रेल्वे प्रबंधक यांनी याची तात्काळ दखल घेऊन दोन तासातच त्यांची भाईंदर रेल्वे स्थानकामध्ये बदलीचा आदेश काढण्यात आला.
आज त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी खासदार राजन विचारे गेले असता पश्चिम रेल्वेचे डीसीएम अशोक तिवारी यांच्या हस्ते बदलीच्या आदेशाची प्रत त्यांना देण्यात आली. त्यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शहरप्रमुख मनोज मयेकर, उपशहरप्रमुख विलास राऊत, आदी उपस्थित होते.