संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नवी मुंबईचे माजी उपमहापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नगरसेवक व राज्याच्या सहकारक्षेत्रातील दिग्गज प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणार्या अशोकशेठ गावडे यांच्या प्रभाग 109 मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवार, दि. 13 जुलै रोजी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या हस्ते होत आहे.
सिवूड्स, सेक्टर 44 येथील एस.एस.हायस्कूलच्या बाजूला सांयकाळी 5 वाजता या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असून यावेळी नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, विशाल डोळस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नगरसेवक अशोकशेठ गावडे व नगरसेविका अॅड. सपना गावडे-गायकवाड हे निमत्रंक आहेत. स्थानिक जनतेला जनसंपर्कासाठी उपयुक्त पडावे आणि त्यांच्या नागरी समस्या निवारणाला गती मिळावी म्हणून या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करत असल्याची माहिती नगरसेवक अशोकशेठ गावडे यांनी दिली.