संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात मृत्यूबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र असताना महापालिका विभाग अधिकारी अथवा स्थानिक नगरसेवकाचे पत्र अंत्यविधीपूर्वी दाखल करण्याचा प्रकार घटनाबाह्य असल्याचे सांगत हा प्रकार रद्द करण्याची लेखी मागणी काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार (विभाग) सेलचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
मृत्यू झाल्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारापूर्वी महापालिका विभाग अधिकारी अथवा स्थानिक नगरसेवकाच्या पत्राची स्मशानभूमी कर्मचारी मागणी करतात. आपला माणूस गमवावा लागल्याने आधीच मृताचे आप्त दु:खाच्या शोकसागरात बुडालेले असतात. त्यातच त्यांना या कागदपत्रासाठी धावपळ करावी लागते. हा सर्वच प्रकार घटनाबाह्य असल्याने मनपा आयुक्तांनी संबंधित अट रद्द करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.