सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील निवासी परिसरात पाण्याची जलवाहिनी तुटल्याने शेकडो लीटर पाणी वाया गेले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ पालिका प्रशासनाशी संपर्क करत या समस्येचे निवारण केले.
सोमवारी, दि. १३ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास प्लॉट १४४ वरील भानुदास सदनसमोरील साहनी कंन्स्ट्रक्शनच्या संरक्षक भिंतीलगतच्या गटारावरील पदपथावरील छोटेखानी जलवाहिनी फुटली. यामुळे शेकडो लीटर पाणी वाया गेले. रहीवाशांनी स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाशी संपर्क साधत जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया जात आहे, शक्य तितक्या लवकर काम करा व होत असलेल्या पाण्याचा अपव्यय टाळा अशा शब्दात महापालिका प्रशासनाच्या संबंधित कर्मचार्यांना नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी समस्येचे गांभीर्य संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले.
जलवाहिनीची देखभाल करणार्या ठेकेदाराच्या माणसांनी येवून जलवाहिनीची दुरूस्ती केली. अवघ्या दोन तासातच तुटलेल्या जलवाहिनीच्या समस्येचे निवारण केल्याबद्दल स्थानिक रहीवाशांनी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांचे आभार मानले.