* प्रभाग क्र-१५ मधील सेतू केंद्र व हायमास्टचे उद्घाटन
संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : नवी मुंबईतील शालेय विद्यार्थीं, जेष्ठ नागरिक आणि गरजूंना विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी प्रवासाचा सामना आणि पैशाचा खर्च करीत ठाण्याला जावे लागते होते. ऐरोली येथे सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आल्याने नागरिकांना आता दिलासा मिळणार असून हे केंद्र गरजूंना आधार देणारे ठरेल, असा विश्वास आ.संदीप नाईक यांनी व्यक्त केला. या प्रसंगी प्रभाग क्रमांक-१५ मध्ये नागरिकांकरीता हायमास्ट बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन आ.नाईक यांच्याहस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक-१५ च्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले एकाच छता खाली मिळावेत यासाठी नगरसेविका संगिता पाटील आणि माजी नगरसेवक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुुरु करण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्राचा शुभारंभ आणि प्रभागातील सेक्टर १४ व १५ या ठिकाणी बसविण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचे लोकार्पण आ.संदीप नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी आ.नाईक बोलत होते.
या कार्यक्रमाला नगरसेविका संगिता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नवी मुंबई शहर (जि) अध्यक्ष अनंत सूतार, राष्ट्रवादी युवकचे जयेश कोंडे, प्रभागातील जेष्ठ कार्यकर्ते सदानंद दरेकर, सतिश काळे, राजेश जोशी, कैलाश गायकर, विठ्ठल बांगर, किरण न्यायनित त्याच बरोबर सेतु सुविधा केंद्राचे प्रकाश गिरी, ज्ञानेश्वर सोलंके, ज्येेष्ठ नागरिक, महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबईतील शालेय विद्यार्थी, महिला आणि जेष्ठ नागरिकांना विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी ठाण्यातील सेतू कार्यालयात लावे लागत होते. यामुळे नागरिकांना प्रवासाचा नाहक त्रास आणि इतरही अडचणीचा सामना करावा लागत हीच बाब लक्षात घेता. आ.संदीप नाईक यांनी ठाण्याचे तहसीलदार विकास पाटील यांच्याकडे नवी मुंबईतील नागरिकांसाठी सेतू केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रभाग क्रमांक-१५ मध्ये सेतू सुविधा केंद्र नगरसेविका संगिता अशोक पाटील यांच्या सहकार्याने नवी मुंबई महापालिका बहूउद्ेशीय इमारत डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवना शेजारी केंद्र सुरु करण्यात आले आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत हे केंद्र सुरु राहणार असल्याचे, पाटील यांनी सांगितले.या सेतू केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना ३६ प्रकारचे दाखले मिळणार असून यात प्रामुख्याने डोमेसाईल, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, जेष्ठ नागरिकांचा दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, वास्तव्याचा दाखला, महिलांना विविध कामासाठी आवश्यक असणारे दाखले मिळणार आहेत.
या प्रसंगी आ.नाईक यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक-१५ मधील सेक्टर १४ येथे लिटील सोसायटी नजीक चौक आणि सेक्टर-१५ येथील साईबाबा मार्केट चौकात नगरसेविका पाटील यांच्या प्रयत्नाने नागरिकांकरीता हायमास्ट दिवे बसविण्यात आले असून त्याचे देखील उद्घाटन आ.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.