संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नेरूळमधील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या लिटील चॅम्प प्री स्कूलच्या वतीने सोमवार, दि. 13 जुलै रोजी नेरूळ सेक्टर 8 परिसरातील महापालिकेच्या उद्यानात सकाळी वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
साई गणेश एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नेरूळ 8 परिसरात लिटील चॅम्प प्री स्कूल गेली 3 वर्षे चालविण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मुलांना वयाच्या तिसर्या वर्षापासूनच वृक्षारोपणाची आवड लागावी, त्यांच्यात वृक्षसंवर्धनाबाबत प्रेम जागृत व्हावे म्हणून आगळावेगळा उपक्रम म्हणून नर्सरीच्या मुलांकडूनच नेरूळ सेक्टर 8 मधील महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव विलास चव्हाण यांनी दिली.
परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका व महापालिकेच्या विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवे या प्रमुख पाहूण्या म्हणून या वृक्षारोपण कार्यक्रमात झाल्या होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक रतन मांडवे, संस्थेच्या पदाधिकारी सौ. वैदेही चव्हाण यांच्यासह स्थानिक भागातील रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 9 वाजता हा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास सुरूवात झाली.
लहान मुलांसमवेत स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाल्या.