मुंबई : पावसाळ्यानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असून राज्यात इतरत्र कुठेही या आजाराची साथ आढळली नसून फक्त मुंबईतचं याचे रुग्ण आहेत. जून महिन्यात या रुग्णांची संख्या 19 वर होती तर जुलैमध्ये पंधरा दिवसात ती संख्या 35 वर पोहोचली आहे.
मुंबई जरी स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असते तरी राज्यात इतर ठिकाणी मात्र स्वाइन फ्लूची साथ नाही, असं आरोग्य खात्याच्या अधिकार्यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वाइन फ्लूच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देत आहेत.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या 1877 इतकी वाढून आतापर्यंत 23 मृत्यू झाले आहे. जनजागृती झाल्यानं स्वाइन फ्लूची चाचणी करण्यांमध्ये वाढ झाली आहे. स्वाइन फ्लू हा आजार पावसाळ्यानंतर तसंच हिवाळा संपताना जास्त वाढतो. इतर फ्लूप्रमाणेच स्वाइन फ्लूदेखील औषधे घेऊन बरा होणारा आजार आहे.