पुणे : दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने मध्य रेल्वेने पुणे आणि मुंबई दरम्यान रात्री आठ वाजता सोळा डब्यांच्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.
या दोन गाड्यांपैकी एक गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पुण्याकडे जाईल. तर दुसरी एर गाडी पुण्याहून मुंबईला येणार आहे.
या विशेष रेल्वे शिवाजीनगर, तळेगाव, मळवली, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे आणि दादर या रेल्वे स्थानकांवर थांबतील. पुण्याहून सुटणारी रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत जाईल, तर मुंबईहून निघणारी रेल्वे पुणे स्थानकापर्यंत येईल, अशी माहिती पुणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक जी. व्ही. सोना यांनी दिली.