नवी मुंबई : भारतीय व्यवस्थापन शास्त्राचे जनक छत्रपति शिवाजी महाराजांच्या सिद्धांताचा खरा वेध घेणारे व्याख्यान म्हणजे शिवाजी द मँनेजमेंट गुरु. या व्याख्यानाचे आयोजन अशोकपुष्प पब्लीकेशनच्या वतीने गेली पाच वर्ष नवी मुंबईत केले जाते. या वर्षी 28 जुलै 2015 रोजी संध्याकाळी 8.30 वाजता ,विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे प्रा .नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानाअंतर्गत छत्रपति शिवाजी महाराजांचे कायम यशस्वी नेतृत्व करण्यासाठी लागणारे सुवर्ण नियम,जग जिंकून देणारे व्यवस्थापन शास्त्रातील चौदा रत्नासह इतर महत्वपूर्ण सिद्धांत सांगण्यात येतील. प्रा .नामदेवराव जाधव यांच्या गनिमी कावा, शिवराय ,पानिपतचा विजय, खरा संभाजी ,उद्योजक शिवाजी महाराज , शिवाजी द मँनेजमेंट गुरु या पुस्तकांची बेस्ट सेलर म्हणून नोंद झाली आहे.आता पर्यंत राजमाता प्रकाशन द्वारा प्रकाशित पुस्तकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल.आमदार बच्चु कडू यांना अशोकपुष्प पब्लिकेशन चा विदर्भ आयकॉन्स 2015 आणि उद्योगश्री पुरस्कार श्री तुकाराम दुधे व के. के म्हात्रे यांना हे पुरस्कार गजल नवाज भीमराव पांचाळे ,आमदार मंदाताई म्हाञे, प्रा.नामदेवराव जाधव , दैनिक केसरी चे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर, सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत, नवी मुबंई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास महाडिक,मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजयकुमार बांदल,देवेंद्र खडसे (अध्यक्ष आय. ए. एस. अकॅडमी, महाराष्ट्र राज्य) व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक उमेश चौधरी यांनी दिली. तसेच रत्नकांत जगताप,पांडुरंग गुरव, नृत्य दिग्दर्शक रोहन पवार ,अभिनेत्री मिनल बाळ, उद्योजक कुमार कोकीळ, उद्योजक अजय कुडवा, उद्योजिका जयश्री दंडवते, नृत्य दिग्दर्शक आशिष त्रिपाठी,नवा बालगंधार च्या निर्माता क्षितीजा वाळके, अभिनेता मनिष कदम यांना त्यांनी दिलेल्या विविध क्षेत्रातील योगदान करिता यावेळी गौरविले जाईल