नवी दिल्ली : जर आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत असाल आणि नाइट शिफ्ट आपल्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनली असेल तर सावध व्हा. नाइट शिफ्टमुळे एकीकडे जिथं आपल्या सोशल लाइफवर वाईट परिणाम होतोय. तर दुसरीकडे आपल्या आरोग्याला यामुळं धोका निर्माण होऊ शकतो.
नाइट शिफ्टमध्ये काम करणार्यांमध्ये प्रोस्टेट कँसर आणि ब्रेस्ट कँसर होण्याची भिती अधिक आहे. या शिफ्टमध्ये काम केल्यानं हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळं कँसरची भिती अधिक वाढते.
ही बाब याआधीही पुढे आली होती की, नाइट शिफ्ट करणार्यांमध्ये कँसर होण्याची भिती वाढते. मात्र तेव्हा यामागचं नेमकं कारण कळत नव्हतं. पण आता बार्सिलोनाच्या पोंपेयु फाबरा यूनिव्हर्सिटीमध्ये एका अभ्यासात याच्या कारणांचा उल्लेख केला गेलाय.
संशोधकांनुसार, नाइट शिफ्ट करणार्यांमध्ये चुकीच्या वेळी सेक्स हार्मोन्स ओएस्ट्रोजेन आणि टेस्टोस्ट्रोनएमआर लेव्हल खूप अधिक वाढते. त्यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात.
या अभ्यासासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणार्या जवळपास 100 लोकांच्या यूरिन सॅम्पलची तपासणी केली गेली. सोबतच त्यांच्या हार्मोन लेव्हलचीही तपासणी केली गेली. परीक्षणात नाइट शिफ्टमध्ये काम करणार्यांमधील सेक्स हार्मोन लेव्हल अधिक आढळली, जी की वेळेनुसार वाईट आणि आरोग्यासाठी घातक आहे.