आयएएस अकादमीच्या परिश्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार!
नवी मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएसअकादमी तर्फे दरवर्षी घेतल्या जाणार्या यूपीएससी सराव परीक्षेस यंदा नवी मुंबईकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
रविवारी, नवी मुंबई येथे ऐरोली सेंटर मध्ये 197 आणि नेरूळ सेंटर मध्ये 200 असे एकुण 397 नवी मुंबईकरांनी ही परीक्षा प्रत्यक्षात देऊन आयएएस, आयपीएस या करीयरकडे वळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले.
27 जुलै रोजी या परीक्षेचा निकाल लागणार आहे.
बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीचा नवी मुंबई जिल्हा संयोजक किशोर शेवाळे यांनी या परिक्षा आयोजनाकरता अविरत परिश्रम घेतले. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्यासह नवी मुंबईतील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत सदर अकादमीचे काम नवी मुंबईत वाढत असुन गेल्या वर्षीचा 131 नवी मुंबईकरांचा नोंदणी आकडा यावर्षी 397 वर पोहोचला आहे.
विरोधी पक्ष नेते विजय चौगुलेंमुळे ऐरोली येथे युरो स्कुल व सिडकोचे माजी संचालक, शिवसेना नगरसेवक नामदेव भगतांमुळे नेरूळ येथे त्यांचे कॉलेज या सर्व नवी मुंबईकरांना परीक्षेकरीता परीक्षा केंद्र म्हणुन उपलब्ध झाले.
गेल्या 10 दिवसापासुन समर्थ भालेकर, विक्रांत विग, करण भारती, अमित आगवणे, सौ.पुनम मोरे-आगवणे व त्यांच्या बरोबर असणार्या शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.