सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता इशारा दिला आहे. छत्रपती उदयन राजे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आहे, त्यात म्हटलंय.
आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर झालेले आरोप त्रास देणारे असून, असे आरोप पुन्हा झाल्यास ते सहन केले जाणार नाहीत. संबंधितांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ.
सांगली येथे एका जाहीर कार्यक्रमात आव्हाड यांनी भिडे गुरुजी यांच्यावर मिरज दंगल घडविल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानावर सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.