शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवेंचा उपक्रम
नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ प्रभाग ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी २६ जुलै ते ३ ऑगस्ट २०१५ या कालावधीत आधार कार्ड सप्ताहाचे आयोजन केले आहे.
नेरूळ सेक्टर ८ येथील शिवसेना शाखेजवळ सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत प्रभाग ८७ मध्ये असणार्या नेरूळ सेक्टर ८ व सेक्टर १० मधील नागरिकांचे आधार कार्ड या सप्ताहादरम्यान काढले जाणार आहे. प्रभागातील रहीवाशी, महिला व लहान मुले आजही आधार कार्डपासून वंचित असल्याने पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरेंसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ‘आधार कार्ड सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिली.
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते रविवारी, दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या सप्ताहाचे उद्घाटन होत असून शिवसेना शहरप्रमुख विजय माने प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या ‘आधार कार्ड सप्ताहा’च्या आयोजनासाठी माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग, महिला विभाग संघठक सौ. सत्वशीला जाधव, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, शाखाप्रमुख बाळू घनवट, महिला शाखा संघठक सौ. गीता निगडे, युवा सेना शाखाधिकारी विशाल गुंजाळ आदी मंडळी परिश्रम करत आहेत.