मुंबई : रिपाइंचे ज्येष्ठ नेते रा.सु.गवई यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. नागपूरच्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गवई यांनी महाराष्ट्रातून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांपैकी ते एक होते. १९६४ ते १९९४ अशी तीस वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सदस्य होते.
१९६८ ते १९७८ या काळात ते विधानपरिषदेचे उपसभापती होते. १९७८ ते ८४ अशी सहावर्ष त्यांनी विधापरिषदेचे सभापतीपद भूषवले. १९८६ ते ८८ अशी दोनवर्ष ते विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते होते.
१९९८ मध्ये ते अमरावती लोकसभा मतदारसंघातून १२ व्या लोकसभेवर निवडून गेले. २००६ ते २००८ अशी दोन वर्ष ते बिहारचे राज्यपाल होते त्यानंतर २००८ ते २०११ अशी तीन वर्ष केरळचे राज्यपाल होते.