नवी दिल्ली : मागील 14 वर्षात भारतातील असंख्य कोट्याधीश व्यक्ती परदेशात गेल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. अहवालानुसार, सुमारे 61 हजार कोट्याधीश टॅक्स, सुरक्षा आणि मुलांचे शिक्षण या समस्यांमुळे भारत सोडून परदेशात स्थायिक झाले आहेत.
न्यू वर्ल्ड हेल्थ आणि एलआयईडओ ग्लोबल यांनी एकत्रितरित्या केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. 2000-2014 या कालावधीदरम्यान तब्बल 61 कोट्याधीशा भारत सोडून परदेशात गेले. तर या यादीत चीन प्रथम क्रमांकावर आहे. चीनमधून मागील 14 वर्षात तब्बल 91 हजाराहून अधिक चीनी नागरिकांनी आपले निवासस्थान बदलले आहे.
अहवालातील माहितीनुसार, भारत सोडलेल्या अनेक कोट्याधींशांनी दुबई, संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशात जाणे पसंत केले आहे तर चीनी नागरिकांची अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर आणि संयुक्त राष्ट्र या देशांची निवड केली. दुसर्या देशातून आलेल्या नागरिकांचे प्रमाण संयुक्त राष्ट्रात अधिक आहे. गेल्या 14 वर्षात विविध देशांतील 1.25 लाख लोक यूकेमध्ये स्थयिक झाले.
याव्यतिरिक्त फ्रान्समधून(42 हजार), रशिया(20 हजार), इंडोनेशिया(12 हजार), दक्षिण आफ्रिका(आठ हजार) आणि इजिप्त(सात हजार) नागरिकांनी आपला देश सोडून जाणे पसंत केले आहे.