संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : केंद्र सरकारची एनर्जी इफिसिएंसी सर्विसेस लिमिटेड दिल्ली या कंपनीमार्फत उर्जेची बचत व्हावी या उद्देशाने कमी विद्युत पुरवठा व जास्त प्रकाश देणारा नव्याने तयार करण्यात आलेला एल.ई.डी बल्बचे वाटप राज्यात सुरु व्हावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र सरकारच्या डी.ई.एल.पी. या योजने अंतर्गत राज्यात या वाटपाला सुरवात करण्यात आली असून यासाठी खासदार राजन विचारे यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ व्हावा यासाठी प्रत्येक प्रभागात दोन ते तीन कार्यक्रम राबविण्याचा आग्रह करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते विजय चौगले, शिवसेना बेलापुर संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे , उपजिल्हाप्रमुख अॅड. मनोहर गायखे, शहरप्रमुख विजय माने , आमदार मंदा म्हात्रे, नगरसेवक एम .के मढवी, प्रशांत पाटील , मनोज हळदणकर, सतीश गवते, मामित चौगले, आकाश मढवी, राजू कांबळे, करण मढवी, संजू वाडे, चेतन नाईक, भारती कोळी, किशोर पाटकर, माजी नगरसेवक राजू पाटील, सुषमा भोईर व इतर शिवसैनिक अन्य पदधिकारी व महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण मंडळाचे मुख्य अभियंता सतीश कर्पे, एनर्जी इफिसिएंसी सर्विसेस लिमिटेड कंपनीचे महा व्यवस्थापक पवन कुमार, प्रोजेक्ट डायरेक्टर. दीपक कोकाटे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने व विजेची गरज व वाढती मागणी लक्षात घेता कमी विद्युत पुरवठ्यामुळे शहरांमध्ये वीज कपातीचे संकट निर्माण झाले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी एल.ई.डी. चा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर उर्जा बचत होऊ शकते, असे एनर्जी इफिसिएंसी सर्विसेस लिमिटेड कंपनीचे म्हणणे आहे. यासाठी केंद्र सरकारच्या डी.ई.एल.पी. या योजनेंअंतर्गत एल.ई.डी. बल्बचे वाटप ठाण्यात व नवी मुबईत एकाच दिवशी विविध ठिकाणी आयोजन करून एरोली येथील सेक्टर 15 मधील हेगडे भवन व टोटल कार मॉल शोरूम समोर पाम बीच रोड बेलापूर या ठिकाणी यांचे केंद्र सुरु होणार असून हे केंद्र प्रत्येक प्रभागामध्ये महिनाभर सुरु होऊन नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी खासदार राजन विचारे यांनी पुढाकार घेऊन त्याचे नियोजन करून हा कार्यक्रम सुरु करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरासाठी 4 बल्ब देण्यात येणार असून याचे बाजारमूल्य प्रत्येकी एका बल्बचे 400 रुपये असे आहे. मात्र या उपक्रमा अंतर्गत केवळ 100 रुपयांत एक बल्ब देण्यात येणार आहे. ज्या कुणाला 100 रुपये देऊन बल्ब विकत घेता येणार नाही, अशांना प्रथम 10 रुपये अदा करून पुढील रक्कम त्यांच्या महिन्याच्या बिलातून दरमहा 10 रुपये रक्कम 10 महिन्यात अदा करून घेतली जाणार आहे. या बल्ब साठी नागरिकांनी वीज बिलाची मूळ प्रत व ओळखपत्र आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतीही एक प्रत आणणे आवश्यक आहे.