नेरूळ : नेरूळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लगाडे (62) यांचे रविवारी (दि. 26 जुलै) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी 12 वाजता नेरूळ सेक्टर शांतीधाम सारसोळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा विशाल परिवार आहे. बांधकाम व्यावसयिक व शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख विरेंद्र लगाडे यांचे ते बंधू होय.
अंत्यविधीच्या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुरज पाटील, नगरसेवक गिरीश म्हात्रे, आरपीआयचे पदाधिकारी महेश खरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अशोक आतकरी, तुकाराम टाव्हरे, काँग्रेसचे अमोल जाधव यांच्यासह नेरूळ सेक्टर 10 व 6 मधील रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक सुरज पाटील, महेश खरे, चंदू जगताप यासह अन्य काहींनी श्रध्दाजंली वाहिली. त्यांचा जलदान विधी नेरूळ सेक्टर 12 येथील ज्येष्ठ नागरिक भवनात बुधवारी (29 जुलै) सकाळी 11 वाजता होणार आहे.