पनवेल : पनवेलचे लोेकप्रिय व लाडके आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य महाशिबीराच्या जय्यत तयारी निमित्ताने भाजप आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी घराघरात जाऊन या संदर्भात प्रचार आणि माहिती देतअसल्याने या महाशिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद असे चित्र तालुक्यात दिसत आहे.
पनवेल शहरात या महाशिबीरानिमित्ताने प्रत्येक वस्तीत, घरोघरी जाऊन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, महिला अध्यक्षा हिना भक्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या संदर्भाची माहितीपत्रके तसेच कोणकोणत्या चाचणी, औषधेवाटप, आजारासंदर्भातील माहिती, दंत, मधुमेह, नाक कान, घसा तपासणी, नेत्र चिकित्सा व चष्मावाटप आदीसंदर्भात माहिती देतआहे. या त्यांच्याआगळ्या वेगळ्या उपक्रमाला घराघरातूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवार दि २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत सीकेटी कॉलेज खांदा वसाहत याठिकाणी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीराला हजारोंची गर्दी लोटणार असा ठाम विचार भाजप युवा मोर्चा महाराष्ट्रप्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांनी व्यक्त केला.