नवी मुंबई : रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुण आणि तरुणींचा नोकर्यांचा शोध ज्याठिकाणी संपतो, तो जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती रोजगार, व्यापार आणि उद्योगच्यावतीने पाचवा भव्य रोजगार मेळावा शनिवार 1 ऑगस्ट रोजी भरविण्यात येणार आहे. ऐरोलीच्या सेक्टर 15 भागातील गुरुदवाराजवळील हेगडे भवन येथे हा मेळावा सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती या मेळाव्याचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी दिली.
लोकनेते गणेश नाईक यांच्या प्रेरणेने हा लोकोपयोगी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या मेळाव्यात स्थानिक कंपन्यांमधून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळत असल्याने कंपन्यांमध्ये उमेदवार टिकण्याची टक्केवारी वाढली आहे. बीपीओ, केपीओ, आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, मॅन्युफॅि3चरींग, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर अॅन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स अॅन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री या क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधील रोजगार संधी या रोजगार मेळाव्यात उमेदवारांसाठी उपलब्ध होणार आहेत. जानेवारी 2012
पासून या रोजगार मेळाव्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. दरवर्षी यामध्ये सहभागी कंपन्या आणि उमेदवारांची संख्या वाढते आहे. जानेवारी 2012 मध्ये 4000 उमेदवारांनी सहभाग घेतला होता त्यापैकी 1000 उमेदवारांना रोजगारप्राप्त झाला होता. जुलै 2012 मध्ये 5000 उमेदवार सहभागी झाले होते त्यापैकी 1500 उमेदवारांना रोजगार मिळाला होता. मे 2013 मध्ये 7000 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. 2037 उमेदवारांना रोजगार मिळाला होता. जानेवारी 2014 मध्ये 8000 उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी 2387 उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील रोजगार मिळाला होता. केवळ सदृढ उमेदवारांनाच नव्हे तर अपंग आणि गतिमंद उमेदवारांना देखील या मेळाव्यामधून रोजगाराचा आधार मिळाला आहे. यावर्षीच्या मेळाव्यात यशस्वी मुलाखतीसाठी मार्गदर्शन सेमिनार होणार आहे. मुलाखतीच्या तयारीसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. मेळाव्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना लगेचच नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. जे उमेदवार काही कारणास्तव रोजगार मिळविण्यास पात्र ठरणार नाहीत त्यांना जीवनधाराच्यावतीने ऐरोलीत 365 दिवस कार्यरत जॉब असिस्ट सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन करुन रोजगार मिळविण्यास मदत केली जाणार आहे.
आमदार संदीप नाईक यांच्या पुढाकाराने ऐरोली येथे 25 एप्रिल 2013 पासून हे सेंटर सुरु करण्यात आले असून त्यामधून रोजगार इच्छुक उमेद2वारांना व्य3तीमत्व विकास, मुलाखतीचे कौशल्य, अधिक चांगल्या नोकर्या कशा मिळवाव्यात, संवाद कौशल्य, सादरीकरण आदींविषयी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येते. ज्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी मेळाव्यासाठी येताना सोबत 7 पासपोर्ट आकाराचे फोटो, बायोडेटाच्या 7 प्रती आणि निवासाचा पुरावा म्हणून रेशनकार्ड आणणे आवश्यक आहे. मेळाव्यासाठी प्रवेश मोफत आहे. नाव नोंदणीसाठी 9594441222 किंवा 8828850000 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोफत रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार तरुण-तरुणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेळाव्याचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.