** वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये कानाच्या आजारासाठी स्वतंत्र विभाग
ठाणे : कान म्हणजे पंचेंद्रियापैकी एक महत्वाचे इंद्रिय परंतु सर्व साधारणपणे आपण या इंद्रीयाकडे सरार्स दुर्लक्ष करतो. कमी ऐकू येणे, कान ठणकणे आदी दुखण्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, कानातून पाणी, रक्त किंवा रक्तमिश्रीत पू येणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही भविष्यात त्यातून मोठे रोग होऊ शकतात. आज शहरामध्ये वाढलेल्या ध्वनी प्रदुषणामुळे कर्णबधीरता हा विकार जास्त प्रमाणात वाढता आहे. वायू प्रदूषण, खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरण्यात येणारी रसायने व त्यामुळे होणारी एलर्जी, कुपोषण आदी समस्या कान वाहण्यास कारणीभूत ठरतात. काही वेळा दातांचे इंफेक्शनही कानाच्या विकारांचे कारण होऊ शकते. वाशी येथील स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे कानांच्या आजारांसाठी स्वतंत्र विभाग सुरु केला असून रविवार ९ ऑगस्ट २०१५ रोजी कानांच्या तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे व या शिबिरात भाग घेण्यासाठी ९९३०९१९७६७ या क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदणे अनिवार्य आहे. कानाच्या संबंधीत आजारासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग चालू केला असून कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.
आज आपल्या देशातील जवळपास शंभर व्यक्तीमागे सुमारे साठ व्यक्ती कानाच्या आजाराने त्रस्त आहेत. कानाच्या छोट्या आजारांकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करणे हे त्यांचे कारण आहे. कानाच्या आजाराचे निदान लवकर केल्यास भविष्यात होणारी हानी टाळता येते़ व योग्य उपचार जर केले नाही तर कायमचा बहिरेपणा येणे, मेंदूमध्ये पू होणे, पाणी जमा होणे यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो़ म्हणुन या आजारांकडे दुर्लक्ष करु नका असे प्रतिपादन वोक्हार्ट हॉस्पिटलमधील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. समीर भोबे यांनी व्यक्त केले आहे. अधिक माहितीसाठी उमेश भोगले ९८२०३३२५१५ यांच्याशी संपर्क साधावा.