बीड : बीड जिल्ह्यात शेतकर्याला बेदम मारहाण करणार्या दोन पोलिसांचे शुक्रवारी निलंबन करण्यात आले. बँकेत पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकर्याने रांग तोडल्याने त्याला पोलिसांनी जबर मारहाण केली होती.
या दोनही पोलीस कॉन्स्टेबल्सवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.
मनोहर अश्रुबा गंधाले असे मारहाण झालेल्या शेतकर्याचे नाव आहे. गंधाले हे तलवाडा ग्राणीम बँकेत पीक वीमाचा हप्ता भरण्यासाठी आले होते. हप्ता भरण्याची शेवटीची तारीख असल्यामुळे बॅकंत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यावेळी गंधाले यांनी रांग तोडल्याने पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. सोशल मिडियावर हा मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
त्यानंतर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विमा हप्ता भरण्याची मुदत सात दिवसांनी वाढवली असून अंतिम तारीख सात ऑगस्ट केली आहे.
बीडमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी ही घटना म्हणजे गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचे म्हटले आहे. ‘मी हा व्हिडीओ पाहिला आहे. एखाद्या जनावराला ज्याप्रमाणे मारहाण केली जाते तशाच प्रकारे पोलिसांनी या शेतकर्याला मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसत आहे, असे मुंडे म्हणाले.