नवी मुंबई : शिवसेना पुरस्कृत गणेशोत्सव मंडळ नेरूळ २-८ व १०च्या अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे २५वे वर्ष आहे.
नेरूळ सेक्टर १२ मध्ये ज्येष्ठ नागरिक भवनात तीन प्रभागातील शिवसेना पदाधिकार्यांची व शिवसैनिकांच्या उपस्थितीत गणेशोत्सव कार्यकारिणीची निवड झाली. या बैठकीला शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, विभागप्रमुख गणेश घाग, शिवाजी महाडीक, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, अशोक येवले, शाखाप्रमुख बाळू घनवट, दिपक शिंदे, बाळू पुजारी, महिला संघटनेच्या बबिता आहेर, रेश्मा वेर्गुलेकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवकरता अध्यक्षपदी माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांची तर सचिवपदी नगरसेवक रंगनाथ औटी आणि खजिनदारपदी माजी नगरसेवक दिलीप घोडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गुरूपौर्णिमेच्या दिनी शुक्रवारी रात्री गणेशोत्वसाच्या जागेवर पुजा करून श्रीफळ वाढविण्यात आले. प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे आणि मंडळाचे अध्यक्ष रतन नामदेव मांडवे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.