नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने पॉर्न साइट्सवर सरसकट बंदी घालण्यास नकार दिला असतानाही केंद्र सरकारच्या दूरसंपर्क विभागाने दिलेल्या आदेशानुसार देशभरातील ८५७ पॉर्न साइट्स बंद करण्यात आल्या आहेत.
देशात रविवारपासून या पॉर्नसाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. यात रेड ट्यूब आणि पॉर्न हब सारख्या लोकप्रिय अनेक साईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. साईट्स ओपन करताना दूरसंपर्ख विभागाच्या निर्देशानुसार या साईट्स ब्लॉक केल्या आहेत, असा संदेश झळकत आहे.
पॉर्नवर बंदी आणून व्यक्तीगत स्वातंत्र्यांचे उल्लंघन करता येणार नाही, भारतात पॉर्न साईट्सवर बंदी अशक्य आहे, असे मत काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले होते.
पॉर्न साइट्स ब्लॉक झाल्याने सोशल मीडियामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जगभरातील प्रसिद्ध ११ पॉर्न साईट्स वगळता अन्य साईट्स मात्र इंटरनेटवर आताही सुरूच आहेत. त्यामुळे या काही साईट्स ब्लॉक करण्यामागचा नेमका उद्देश काय, असा सवाल नेटीझन्सनी केला आहे.
या साईट्स ब्लॉक केल्यामुळे अनेकांनी ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली. अनेक नेटिझन्सनी याला कडाडून विरोध केला आहे. तर अनेकांनी पॉर्न वेबसाईट्स बंद झाल्याने आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारतात पॉर्न साईट्स पाहणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. केवळ पॉर्न हबच्या आकडेवारीनुसार, ४० टक्के यूजर्स हे भारतात आहेत. मिझोराममधील नेटिझन्स सर्वाधिक पॉर्न पाहतात, त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. सनी लिओन ही देशातील मोस्ट सर्चड् पोर्नस्टार ठरली आहे.
इंटरनेटवर डाऊनलोडींगसाठी २० कोटींपेक्षा जास्त पॉर्न क्लिपिंग्ज उपलब्ध आहेत. तर पोर्नोग्राफीशी संबंधित ५० हजार वेबसाइट्स आणि प्रौढ पोर्नोग्राफीशी संबंधित एक लाख ७० हजार वेबसाइट्स असल्याचे २०१३ मध्ये केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.