एलबीटी रद्द झाल्यानं घराच्या किमती वाढण्याची शक्यता
मुंबई: तुम्ही जर घरं घेण्याच्या विचारात असाल, तर हा निर्णय लवकर घ्या, कारण घरांच्या किंमती वाढण्याची शक्यताय.
राज्यात एलबीटी तर रद्द झालाय खरा, पण त्याच्या भरपाईसाठी सरकारनं मुद्रांकांच्या विक्रीतून मिळणार्या उत्पन्नाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं येत्या काही दिवसात घरांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यताय. राज्याला सध्या मुद्रांक विक्रीतून सुमारे १० हजार कोटींचं उत्पन्न मिळतं.
एलबीटी रद्द झाल्यानं महापालिकांना साधारण २ हजार कोटींची भरपाई करावी लागणार आहे. त्यासाठी मुद्रांकांच्या विक्रीतून भरपाई द्यायची असेल, तर उत्पन्न वाढवावं लागणार आहे.