पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष बंटी वाळुंज यांचा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
कामशेत येथील महाराष्ट्र बँकेसमोर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वाळूंज यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मावळमध्ये आज ग्रामपंचायत निवडणूकीची धामधुम आहे. या घटनेमुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मनसेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मावळ तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या 323 जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गुरुवारी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, कामशेत व वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाळुंज यांच्यावर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळीबार करण्यात आला का, याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.