नवी दिल्ली : पॉर्न साईट्सवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, इंटरनेटच्या माध्यमामधून सर्वाधिक पॉर्न साईट्स पाहिल्या जाणार्या राज्यांच्या यादीमध्ये मिझोराम अग्रस्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या यादीमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक असून दिल्ली दुसर्या स्थानावर आहे. मिझोरामसहित नागालँड, मेघालय, आणि आसाम ही ईशान्य भारतामधील राज्येही या यादीमध्ये आघाडीवर आहेत. याच अहवालानुसार, सर्वाधिक पॉर्न साईट्स पाहणार्या देशांच्या यादीमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सुमारे 800 पॉर्न साईट्सवर बंदी घातल्याने देशात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.