मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिऑनला सध्या सिनेमांमध्ये प्रचंड मागणी आहे. काही दिवसांपूर्वीच सनी लिऑनने सांगितले होते की, एका दिवसात तब्बल 10 सिनेमांची तिच्यासमोर रांग लागलेली असते. सनी लिऑनही या प्रसिद्धीचा पुरेपूर फायदा घेताना दिसते आहे.
आता हेच पाहा ना. एका जाहिरातीसाठी सनी लिऑनने तब्बल 8 कोटी रुपये घेतले. बरं हे कुठल्या फॅशनेबल प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी नव्हे, तर एका औषधाच्या जाहिरातीसाठी सनीने एवढी रक्कम घेतलीय. ही जाहिरात केवळ चार दिवसांत शूट झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सनीने एका दिवसासाठी 2 कोटी रुपये घेतले. त्यामुळे जाहिरात निर्मात्याला पूर्ण शूटिंगसाठी सनी लिऑनसाठी तब्बल 8 कोटी रुपये मोजावे लागले.
रागिनी एमएमएस 2, एक पहेली लीला आणि कुछ कुछ लोचा है सारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणार्या सनी लिऑनची बॉलिवूडमध्ये डिमांड वाढली आहे. त्यामुळेच की काय, सनी लिऑनने आपलं मानधनही वाढवलं आहे.