नवी दिल्ली : पॉर्न वेबसाइट्सवर सरकारनं बंदी घातल्यानंतर आता त्याचा विरोध सुरू झालाय. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विट करत पॉर्न वेबसाइट्स बंदीचा विरोध केलाय. वर्मानं ट्विटमध्ये म्हटलं, आता सरकारनं पॉर्नवर बंदी घातली लवकरच सरकार बेडरूममध्ये पाहायला येऊ शकतं की, कपल्स कशापद्धतीनं सेक्स करत आहेत?
वर्मानं दुसर्या ट्विटमध्ये म्हटलं, मला वाटतं सरकार कपल्सला पोझिशनबद्दलही निर्देश देतील आणि सांगेल काय करावं आणि काय नाही? नक्की हे पुढचं पाऊल असेल.
रामगोपाल वर्मा एवढ्यावरच थांबले नाही, तर आपल्या पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं, की भारतीय पॉर्नला पसंत करतात. संपूर्ण ऑनलाइन ट्रॅफिकमध्ये भारताचं रँकिंग पहिल्या पाचमध्ये आहे जेव्हा की यूएस नंबर एक वर आहे. 50 टक्के भारतीय आपल्या फोनवरून पॉर्नहबपर्यंत पोहोचतात. संपूर्ण अँड्रॉईड ट्रॅफिकमध्ये भारताचं रँकिंह तिसरं आणि अमेरिका, ब्रिटन पहिल्या आणि दुसर्या नंबरवर आहे. वर्मानं आपल्या एका ट्विटमध्ये सांगितलं की, याचा अर्थ सरकारला पुढील निवडणुकीत कमी मतं मिळतील.
भारतीय दूरसंचार विभागानं शुक्रवारी 857 पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश दिलाय. बीएसएनएल, एमटीएनएल आणि वोडाफोननं आपल्या नेटवर्कवर पॉर्न साइट्स ब्लॉक केल्या आहेत.