सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेच्या राजकारणात नेरूळ सेक्टर 16-18 हा शिवसेनेचा बालेकिल्ला भेदून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक प्रभावीपणे जनाधारातून वाजवायला लावणार्या भगत परिवाराकडून ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांचे वाढदिवसानिमित्त मंगळवारी सांयकाळी व्हाईट हाऊसवर अभिष्ठचिंतन करण्यात आले.
प्रभाग 96 हा राजकीय परिभाषेत शिवसेनेचाच बालेकिल्ला. 2005 साली या ठिकाणाहून शिवसेनेचे विजय माने तर 2015 साली शिवसेनेचेच सतीश रामाणे या ठिकाणाहून विजयी झाले. 2005 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोजमल पाटील यांनी तर 2010 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेशदादा भगत यांनी निकराची झुंज देवूनही त्यांना शिवसेनेचा बालेकिल्ला भेदता आला नाही. पराभूत झाल्यावरही गणेशदादा भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपिठावरून नेरूळ सेक्टर 16-18-24 परिसरात जनहितैषी कामाचा धडाला कायम ठेवला. सोबतीला रविंद्र भगत व सहकार्यांची युवा फौज मदतीला होतीच. पाच वर्षांची गणेशदादा भगतांची जनसेवा मतदारांनी मतपेटीतून स्वीकारली आणि सौ. रूपाली किसमत भगत यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडून घड्याळाची टिकटिक सुरू झाली. शिवसेनेचा बालेकिल्ला भेदणारे म्हणून भगत परिवाराला नेरूळ परिसरात जांयट किलर म्हणूनच संबोधले जावू लागले आहे.
आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेशदादा भगत, नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, किसमत भगत, रविंद्र भगत, चंद्रकांत महाजन आणि अन्य कार्यकर्त्यांनी व्हाईट हाऊसवर जावून आमदार संदीप नाईकांचे अभिष्ठचिंतन केले.