चाइल्ड पॉर्नवर बंदी कायम
नवी दिल्ली : पॉर्न साइट्सवर बंदी लादण्याचा आपल्या निर्णयाने सरकारने यू-टर्न घेतला आहे. सरकारने मंगळवारी चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
वाढत्या विरोधामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार आता चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्मवर बॅन कायम राहणार आहे. सरकारने आपल्या एका आदेशात 857 पॉर्न साइट्स बंद केल्या होत्या. त्यातील 700 साइट्सवरील बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे या 700 साइट्स लोक पाहू शकणार आहेत.
सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत एडल्ट साइट्सवर बंदी लावली होती पण वाढता विरोध पाहता सरकारने बंदी उठविण्याची निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.