मुंबई : सूर्यकांता चिक्कीप्रकरणी कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी तोंड उघडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, अशी तोफ राणेंनी डागली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच कंत्राट देण्यासाठी शिफारस केल्याचा दावा राणेंनी केलाय.
नारायण राणेंनी गेल्या काही महिन्यांचं मौन सोडत भाजप-शिवसेना युती सरकारवर टीका केलीय. चिक्की प्रकरणात सूर्यकांताला कंत्राट द्यावे, असे मी कधी सांगितलं नव्हतं. उलट २०१२ साली सूर्यकांताला कंत्राट द्या म्हणून एकनाथ खडसेंनी शिफारस केली होती, असा सनसनाटी आरोप राणेंनी केलाय. चिक्की प्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना विरोधकांनी घेरले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १५ वर्षांतील निविदांची चौकशी करण्याची घोषणा केली. तसेच चिक्कीचेे कंत्राट कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्तीला दिलाचा आरोप राणेंवर करण्यात आला होता. त्यानंतर राणेंनी उत्तर दिले.
दरम्यान, राणे यांनी कॉंग्रेसला घरचा आहेर दिलाय. कॉंग्रेस विरोधक म्हणून कमी पडत असल्याची टीकाही त्यांनी केलीय.