नवी दिल्ली : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावणार्या न्यायाधीशांना धमकी देण्यात आली आहे.
मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला 30 जुलै रोजी फाशी देण्यात आली. याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यावेळी तीन न्यायाधीश होते. त्यापैकी फाशीची शिक्षा सुनावणार्या दीपक मिश्रा या न्यायाधीशांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अला उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे.
या धमकीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या सुरक्षेत अधिक वाढ केली आहे.