*** खासदार राजन विचारे यांचा संसदेत शून्य प्रहर
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : एतिहासिक दर्जा प्राप्त असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातुन दररोज सात ते आठ लाख लोक प्रवासी ये-जा करीत असतात त्यापैकी बहुतांश प्रवासी घोडबंदर वरून ठाणे रेल्वे स्थानाकात येतात त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवलीचे प्रवासी नोकरीसाठी नवी मुंबई येथे येत असल्याने त्यानाही ठाणे रेल्वे स्थानकात येवून हार्बर मार्गे वाशीला जावे लागते. त्यामुळे हा भार दिवसेदिवस वाढत असून ठाणे रेल्वे स्थानकाची क्षमता संपत आली आहे. गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला ठाणे-मुलुंडच्या दरम्यान विस्तारित रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळावी यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहर वर चर्चा करुण सभागृहाचे पुन्हा लक्ष्य वेधून चर्चा केली.
या चर्चेत देशातील पहिली रेल्वे धावलेल्या या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थनाकात येणार्या प्रवासी संख्या वाढत असून या शहराची लोकसंख्या 20 ते 23 लाखावर जाऊन पोहचली आहे व नवे ट्रॅक ही घालण्यासाठी जागाही उपलब्ध नसल्याने या साठी नवीन रेल्वे स्थानकाची गरज लक्षात घेता राज्य सरकारच्या आरोग्य खात्याच्या अखत्यारित असलेली ठाणे मेन्टल हॉस्पिटलच्या 18 एकर जागेपैकी 10 एकर जागेवर हॉस्पिटल व उर्वरित जागेवर विस्तारित नविन रेल्वे स्थानकाला मंजूरी द्यावी अशी मागणी सभागृहात रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे करण्यात आली त्यावर ते रेल्वे मंत्री ठाण्यात आलेले असताना त्यावेळी या नवीन रेल्वे स्थानाकाचे सादरीकरण करण्यात आले होते त्यावेळी आपण या प्रस्थावाला अनुकलताही दर्शवली होती असे विचारे यांनी म्हटले आहे.