मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाण्यासाठी रेल्वे गाडयांचे आरक्षण झाले असताना आता मध्य रेल्वे प्रशासनातर्फे आणखीन ११८ नवीन गाडयांची घोषणा करण्यात आली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी)-मडगाव-एलटीटी (गाडी क्र.०१००५) ही ८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत फक्त गुरुवार वगळता दररोज धावणार आहे. तसेच एलटीटीहून ही गाडी रात्री १२.५५ वा. सुटून मडगावला त्याच दिवशी दु.२.४० वा पोहोचेल. परतीच्या मार्गावर मडगाव-एलटीटी ही विशेष गाडी मडगावहून दु.३.२५ वा सुटून एलटीटी येथे पहाटे ३.५५ वाजता पोहोचेल.
तर, एलटीटी-करमाळी ही (गाडी क्र. ०१०२५) ८ ते २८ सप्टेंबर कालावधीत दररोज धावणार आहे. ही गाडी एलटीटीहून सायंकाळी ५.३० वा. सुटून करमाळी येथे त्याच दिवशी सायं ५ वा. पोहोचेल. परतीच्या वाटेवर करमाळी-एलटीटी (गाडी क्र. ०१०२६) ही विशेष गाडी ९ ते २९ सप्टेंबर कालावधीत दररोज धावेल. ही गाडी करमाळीहून सकाळी ५.५० वा. सुटून एलटीटी येथे सायं ५.४५ वा. पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, झाराप, सावंतवाडी, मडुरे, थिवीम, करमाळी इत्यादी स्थानकावर थांबेल.
०१००५ आणि ०१०२५ या गाड्यांसाठी आरक्षण १४ एप्रिलपासून सुरु होणार आहे. तर पनवेल-चिपळून डेमू विशेष गाडी अनारक्षित म्हणून धावणार आहे.
**डेमूचे वेळापत्रक
मध्य रेल्वेने याआधी केलेल्या पनवेल-चिपळूण-पनवेल गाडीच्या तारखा आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गाडी क्र.०११०७ ही डेमू ४,५,६,८,९,११,१२,१३,१५,१६,१७,१९,२०,२१,२३,२४,२६,२७,२९,३० सप्टेंबर रोजी पनवेलहून सकाळी ११.१० वा. सुटेल. ही गाडी चिपळूण येथे दुपारी ४ वा. पोहोचेल. गाडी क्र.०११०८ ही चिपळूणहून त्याच दिवशी सायं ५.३० वा. सुटून पनवेल येथे रात्री १०.३० वा. पोहोचेल.