सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : पामबीच मार्गावर भरधाव वेगात जाणार्या वाहनांना वेग नियत्रंणात न आल्याने अपघात होण्याच्या घटना नियमित घडत असतात. बुधवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास नेरूळ सेक्टर 24 आगरी-कोळी भवनाकडे वळसा मारणार्या होंडा सिटी गाडीच्या चालकाला वेग नियत्रंणात न आल्याने वाहनाने रस्त्यावर पलटी मारली. प्रत्यक्षदर्शीने लवकर वाहन सरळ केले असता वाहनामध्ये चार मुले व एक मुलगी आढळून आली. गाडीमध्ये स्पीकर मोठ्या कर्णकर्कश आवाजात सुरू असल्याचे पहावयास मिळाले. श्रीमंतांच्या मुलांची मस्ती असल्याची संतप्त प्रतिक्रिया अन्य वाहनचालकांकडून यावेळी व्यक्त करण्यात येत होती. अपघात झाला, त्यावेळी काही सेंकदातच नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी हजर झाले.
दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर शहारे उमटले ते ब्रेक दावबण्याच्या व अपघाताच्या घटनेनेच. वाशीहून बेलापुरहून जाण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्या होंडा सिटी (अंदाजे स्पीड 100 ते 140)वाहनाने (क्रं. एमएच/43, एबी 7444) वळसा घेत पलटी मारली व रस्त्यावरच दुभाजकावर पलटी खाल्ली. यावेळी त्या ठिकाणाहून जात असलेले नवी मुंबई लाइव्ह.कॉमचे संपादक संदीप खांडगेपाटील यांनी पाच ते सहा जणांना जमा करून वाहन सरळ केले. त्यावेळी वाहनामध्ये चार कॉलेजची मुले व एक मुलगी निदर्शनास आली. गाडीत मोठ्या आवाजात स्पीकरवर गाणी सुरूच होती.
गाडीने पलटी मारल्याने मागील बाजूचे चाक पूर्णपणे वाकले होते. अपघात झाला, त्यावेळी फारशी वर्दळ नव्हती. पण अपघातानंतर काही मिनिटातच गाडीतील मुुलांनी आपल्या मित्रांना बोलावून घेतले व गाडीचे मागचे चाक पंक्चर झाल्याने हा अपघात झाल्याचा कांगावा नेरूळ पोलिसांसमोर सुरू केला. प्रत्यक्षात गाडी अपघात झाल्यावरही कोठेही पंक्चर झाल्याचे दिसून येत नव्हते. गाडीमध्ये गाण्याच्या धुंदीत मस्ती करत जाणार्या कॉलेजच्या युवकांना 100 ते 140च्या स्पीडवर भरधाव वेगातील गाडी नियत्रंणात न आल्याने हा अपघात झाल्याची माहिती अपघातस्थळी असणार्या पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी दिली.
गाडी चालविणार्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला मिसरूडही अद्यापि न फुटल्याने त्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे अथवा नाही याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चार मुले व एक मुलगी आणि गाडीतील मोठ्या आवाजातील गाणी, भरधाव वेग यामुळे हा अपघात झाला असून नशिब त्यावेळी वळसा मारण्याच्या जागेवर वाहने अथवा माणसांची वर्दळ नसल्याने जिवितहानी झाली नाही. याप्रकरणी नेरूळ पोलीस घटनास्थळी असून नेरूळ पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.